Bjp Mla Yogesh Tilekar :भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकाची हत्या, अपहरणाच्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला
Bjp Mla Yogesh Tilekar Family Member Kidnapped In Pune : पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉक करत असताना काही अज्ञात लोकांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह यवत परिसरात आढळून आला.
पुणे :- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि विधानपरिषद (एमएलसी) सदस्य योगेश टिळेकर BJP MLA Yogesh Tilekar यांच्या नातेवाईकाची सोमवारी (9 डिसेंबर) पुण्यात अज्ञातांनी अपहरण करून हत्या केली.योगेश टिळेकर यांचे नातेवाईक सतीश वाघ (55 वय) हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना पुणे शहरातील हडपसर भागातील शेवाळवाडी चौकाजवळ चार ते पाच जणांनी त्यांना एसयूव्हीमध्ये बसवले, याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
यानंतर पोलिसांनी सतीश वाघच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, सतीश वाघ यांचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतजवळ त्यांच्या अपहरणाच्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरावर आढळून आला.मनोज पाटील म्हणाले, त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके प्रयत्न करत आहेत. मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
आदल्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की सतीश वाघ यांच्या कुटुंबाला खंडणीचा कोणताही फोन आलेला नाही किंवा कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केला नाही.सतीश वाघ यांना शेतीची आवड असून शेवाळवाडीजवळ त्यांचे हॉटेलही होते. हडपसर पोलीस हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा मार्ग शोधून पुढील तपास करत आहेत.हा खून काही वैयक्तिक वैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या कुटुंबीयांना कुठल्या प्रकारची धमकी दिली गेली होती का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. जमिनीचा वाद, वैयक्तिक संबंध किंवा अन्य कारणेही तपासात ठेवण्यात आली आहेत.