मुंबई

Krantijyot Mahila Vikas Foundation : लेडीज, ऑर्केष्ट्रा बारमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करा : क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनची मागणी

•लेडीज डान्सबार आणि ऑर्केस्ट्रा बारवर सीसीटीव्हीचे नजर?

पनवेल जितिन शेट्टी : पनवेलसह आजूबाजूच्या परिसरात लेडीज बार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. अशा बारमध्ये गैरप्रकारांचे प्रमाण वाढले असून त्यावर आळा बसावा यासाठी प्रत्येक लेडीज बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावेत, त्यांचे नियंत्रण नजीकच्या पोलिस ठाण्यात बसवावे अशी मागणी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष रूपाली शिंदे यांनी केली आहे.

लेडीजबारमध्ये बारबालांचे असभ्य वर्तन आढळल्याने पनवेल तालुका पोलिसांनी कोन गावातील बिनधास्त नावाच्या लेडीज बारवर पाचदिवसांची बंदी घातली. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद असली तरी या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पैशाच्या उधळपट्टीसह बारमध्ये डान्स करणाऱ्या महिलेला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबाबतही पोलिसांनी खबरदारी म्हणून या परिसरातील सर्व डान्सबार मध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करावे. जेणेकरून ग्राहक आणि बाळ डान्सर यांच्यात एक सभ्यता राखण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे.

लेडीज बारमध्ये अनेकजण पैशांचा पाऊस पाडत असल्याचे व्हीडीओ समाजमाध्यमातून व्हायरल होतात. एवढा पैसा येतो कुठून ? कोण असे पैसे उडवतो ? शिवाय या बारमध्ये अनेकजण मद्यधुंद अवस्थेत असल्याने भांडणे होतात. लेडीज बारसाठी ठरवून दिलेली नियमावली न अवलंबल्याने अनेक बारमध्ये गैरप्रकार घडतात. प्रसंगी अश्लील वर्तनही उघडकीस येते. तेथे अनेकजण व्यसनामुळेमोडकळीस आलेले पाहायला मिळतात. बारबालांच्या नादात अनेकांचे संसार, आयुष्य उध्दवस्त होतात. यातील वैमनस्याचे रुपांतर घात – अपघात घडवून आणू शकते. त्यामुळे सर्वच बारमध्ये चालू अवस्थेतील सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण त्या – त्या लेडीज बारच्या जवळील कार्यक्षेत्रात असलेल्या पोलिस ठाण्यात असले म्हणजे गैरप्रकारांवर आळा बसेल. पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन बारचालकांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणीही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनने शासन दरबारी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0