Kalyan Breaking News : आंबिवली इराणी लोकांकडून पोलिसावरील हल्ला प्रकरण, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
Kalyan Police Latest News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी आहे.इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते.
कल्याण :- इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला Kalyan Police झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते. मात्र कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीत बुधवारी (4 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास इराण्यांनी पुन्हा एकदा पोलीस पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
मुंबई एमआयडीसी पोलिसांनी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे व त्यांचे पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ओनु लाला इराणी (विश्व, रा. आंबिवली कल्याण) नावाच्या चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते. इराणी वस्तीतून ओनु ताब्यात घेऊन काही अंतरावर पोलीस गेले असतानाच अचानक इराणी जमावाने विरोध करत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले. मात्र या इराणी जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात देखील पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), 132, 121(1), 189(2) (3) (5), 262, 263, 352, 351(1), 3(5) सह रेल्वे ॲक्ट 1989 चे कलम 145, 147, 150, क्रिमीनल ॲमेंडमेंट कायदा कलम 7 प्रमाणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, 4 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच उर्वरित पाहिजे आरोपींचा शोध व गुन्हयाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन Khadakpada Police Station हे करीत आहेत.