Panvel Police News : “महाराष्ट्र मिरर”वृत्तसंस्थेच्या बातम्याचा इम्पॅक्ट, चमत्कारी स्वामी समर्थ देव्हाऱ्यातील पोथी मध्ये अंगारा निघत असलेल्या चमत्कारी गोष्टीवर पोलिसांची कारवाई
Panvel Police Latest News : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेप घेतल्यानंतर, पनवेल पोलिसांची कारवाई महिलाविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल महाराष्ट्र मिरर :- महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने Maharashtra Mirror काही दिवसांपूर्वी पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथे राहत असलेल्या सुधाकर घरात यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. या मठातून अंगारा आणि पोथीतुन सुगंधी वास येत असल्याचे बातमी प्रसिद्ध झाली होती.
बातमीच्या आधारे सत्यता पडताळण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत सुधाकर घरत यांना हा चमत्कार सिद्ध करून दाखवण्याकरिता 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु हा कोणताही चमत्कार नसून यामध्ये केवळ आणि केवळ अंधश्रद्धा असल्याचे समितीकडून सिद्ध करण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच कांचन सुतार यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहे.