Panvel Crime News : पनवेल महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड: प्रभाग अधिकाऱ्यांचा बेशरम कारभार उघडकीस!
सामाजिक कार्यकर्ते अरमान(विशाल) संजय पवार यांचा महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर आरोप, अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले
पनवेल जितिन शेट्टी : महानगरपालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांचा भ्रष्ट आणि लाचार कारभार पाहता, हे अधिकारी महापालिकेचे की भ्रष्टाचाराला पोसणाऱ्या दलालांचे, असा प्रश्न पडतो. हातगाडी, झोपडपट्टीत राहणारे गरीब आणि हतबल लोक यांच्यावरच केवळ कारवाई करणं हाच त्यांच्या कामाचा उद्देश आहे का? अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर, बेकायदेशीर होर्डिंग्स लावणारे, डान्स बार्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स जे जनरेटर व जागा अतिक्रमित करून धंदा करत आहेत, यांच्यावर कारवाई करायची वेळ आली की हे अधिकारी बांगड्या घालून बसतात.
महानगरपालिकेचा हा प्रकार म्हणजे एक जाहीर तमाशा आहे. गरीब लोकांवर कारवाई करून मोठे ‘काम’ केल्याचा दिखावा करणारे हे चारही प्रभाग अधिकारी, खऱ्या गुन्हेगारांसमोर नेहमीच गप्प राहतात. का? त्यांना हाताखाली घालून पैसे मिळवण्याची सुविधा दिलेली आहे का?
मी आजवर केलेल्या असंख्य तक्रारींची यादी माझ्याकडे आहे, ज्या दाखवू शकतो. मग सांगा, का नाही झाली कारवाई? हातगाडी, गरीब झोपडपट्टीवाले हेच काय फक्त अतिक्रमण करणारे आहेत? की अधिकाऱ्यांना मोठ्या माशांवर हात घालायची धमकच नाही? यावरून ही यंत्रणा फक्त गरीबांचा छळ करण्यासाठीच उभी आहे, हे सिद्ध होतं.
चारही प्रभाग अधिकाऱ्यांचं वर्तन म्हणजे एक मोठा लांच्छन आहे. हे अधिकारी पनवेलच्या व्यवस्थेला काळीमा फासत आहेत. पनवेल महानगरपालिका स्वतः त्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करत आहात का? त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई का केली नाही? महापालिकेची यंत्रणा इतकी निकृष्ट आणि लाचार कशी?
जर पनवेल महानगरपालिका या चारही प्रभाग अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर आम्हाला उच्च पातळीवर जाऊन पनवेल महानगरपालिका आयुक्त यांचा सकट या महापालिकेची लाज उघड करावी लागेल. पनवेल महानगरपालिका व्यवस्थेचा आणि भ्रष्ट अधिकार्यांचा संपूर्णपणे धिक्कार आहे.
पनवेल महानगरपालिका व्यवस्थेची लाजिरवाणी अवस्था सर्वांसमोर आणण्यासाठी आम्ही तयार आहोत.