Khar Robbery News : खारमध्ये देखभाल करणाऱ्या मुलीने तब्बल 1000 ग्रॅम सोन्याचे आणि दोन किलो चांदीचे दागिन्यांची चोरी, खार पोलिसांकडून अटक
Khar Robbery News : घराची आणि वृद्धा आईची देखरेख करणाऱ्या तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने तब्बल हजार ग्रॅम सोन्याचे आणि दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले, खार पोलिसांनी दोन्ही आरोपींना केले अटक
मुंबई :- मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Khar Ucchaprabhu Society Robbery वृद्धा आईची सेवा आणि घराची देखरेख करण्याकरिता कामावर ठेवलेले एका वीस वर्षीय तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने तब्बल हजार ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले आहे. Khar Robbery News याप्रकरणी खार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 665 ग्रॅम सोन्याचे आणि एक किलो चांदीचे दागिने पोलिसांनी Khar Police Station हस्तगत केल्या आहेत. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पांचाली संतोष ठाकुर, (वय 57 रा.अहीसा मार्ग, १४, रोड, खार ) यांनी त्यांचे घरात त्यांची आईची देखभाल करण्यासाठी महीमा नागेंद्र निशाद, (वय 20) या तरुणीला कामावर ठेवले होते. परंतु, या तरुणीने घरातील कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत मे 2024 ते नोव्हेंबर 24 या कालावधी दरम्यान वर्षे हिने त्यांचे आईचे कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 1000 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 2 किलो चांदिचे दागिने चोरी केलेले आहेत. अशी तकार खार पोलीस ठाणे येथे 8 नोव्हेंबर रोजी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 306 भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. Mumbai Latest Crime News
गुन्हयाचा तपास व तांत्रिक विश्लेषनावरुन गुन्हा हा आरोपी क्र. 1 महीमा नागेंद्र निशाद हिने तीचा साथिदार आरोपी क. 2 रजनिश उर्फ विशाल शिवधन आर्या (वय 22) याचे सह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीकडून गुन्हयातील 665 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1 किलो चांदीचे दागिने असा एकूण 47 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजितसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-9 दिक्षीत गेडाम,सहाय्यक पोलीस आयुक्त, वांद्रे विभाग अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव धुमाळ, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), वैभव काटकर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुंभारे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, योगेश तोरणे, महेश लहामगे, मनोज हांडगे, मयूर जाधव, महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोराटे, अनिशा मोरे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे. Mumbai Latest Crime News