Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे यूट्यूब चॅनल, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिलांविषयी गुन्हे यांची जनजागृती नागरिकांना होणार फायदा!
Navi Mumbai Police News: “Cyber Safe Navi Mumbai Official” या नावाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे यूट्यूब चॅनल
नवी मुंबई :- भारतात मोठ्या प्रमाणावर आधुनिक क्रांती झाली असून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. Navi Mumbai Police अशा सोशल मीडियाचा वापर करून पोलिसांकडून गुन्हेगारीला आता आळा बसणार असून लोकांमध्ये जनजागृती होणार आहे. त्याचे कारण म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने स्वतःचे youtube चॅनल चालू केले आहे. लोकांची होणारी आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम, आणि महिलांना सार्वजनिक जीवनात भेडसावणाऱ्या अपारकार्य समस्या यासाठी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिलाविषयक गुन्हे याबाबत जनजागृती करण्यासाठी youtube चॅनल चालू करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे यांनी सांगितले आहे.
नवी मुंबई पोलीसांचे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल, इन्स्टाग्राम अकाऊंट, फेसबुक पेज व एक्स (X) हॅन्डल यापुर्वीच सुरु करण्यात आलेले आहेत. या सर्व चॅनल / अकाऊंटच्या माध्यमातून नागरीकांमध्ये विविध विषयावर जनजागृती केली जाते.
तसेच नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क. 8828-112-112 ही देखील सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनव्दारे जनतेला विविध सायबर गुन्हयांबाबत माहिती देऊन जागरुक केले जाते. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रमध्ये नवी मुंबई पोलीस हा पहिला पोलीस घटक आहे ज्याने पोलीस विभागाचे अधिकृत यु-ट्यूब व व्हॉट्सॲप चॅनल सुरु केल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे यांनी सांगितले आहे.