Mira Road Crime News : दोन नायजेरियन व्यक्तीकडून 1.19 कोटींचे अंमली पदार्थ जप्त,नालासोपारा अंमली पदार्थांचे केंद्र?
•मिरा रोड, वसई, विरार,नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, तस्करी करण्यात नंबर एकचे शहर,
मिरारोड :- मिरारोड ते नालासोपारा शहर हे अंमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे. नयानगर पोलिसांनी 30 नोव्हेंबरच्या रात्री दोन नायजेरियन व्यक्तीकडून तब्बल 1 कोटी 19 लाख 40 हजार रुपयांचे उच्च प्रतीचे कोकेन अंमली पदार्थ जप्त केले आहे. मागील महिन्यात देखील तुळींज पोलिसांनी नायजेरियन महिलेकडून 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते.
नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. हे नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय आहेत. नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुनम सागर रोडवर दोन नायजेरियन व्यक्ती संशयित हालचाली करताना पोलिसांना आढळून आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक हे या परिसरात गस्ती घालत असताना या दोन नायजेरियन संशयित आरोपींना तब्येत घेतले. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही नायजेरियन व्यक्तीकडे 159.2 ग्रॅम वजनाच्या 1 कोटी 19 लाख 40 हजार रुपये किंमतीचा उच्च प्रतीचा कोकेन हा अंमली पदार्थ पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे. अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आणल्याचे आरोपींनी सांगितले असून,पोलिसांनी आरोपींच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नयानगर पोलीस ठाण्यामार्फत चालू आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 अतिरीक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक, पोलीस हवालदार धनाजी इंगळे, पवन पाटील, महेश पागधरे, सुभाष आव्हाड, अजय यादव, पवन डोखळे यांनी केली आहे.