कळंब तालुक्यात मध्ये अवैद्य गौण खनिज पथक स्थापन तहसीलदार हेमंत ढोकले
कळंब(प्रतिनिधी) दि.३० नोंव्हेबर कळंब तालुक्यातील अवैद्य वाळू माती दगड व मुरूम उत्खनन व वाहतुकीमध्ये खूप प्रमाण वाढले असून व अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तालुक्यामध्ये अवैद्य गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रतिबंधक करण्याच्या दृष्टीने ग्रस्त पथक स्थापन करण्यात आले आहे कळंब त्यामुळे अवैद्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या चे धाबे दणाणले दणाणले तालुक्यातील सात मंडळाधिकारी यांना आदेश करण्यात आले आहे या पथकामध्ये मंडळ अधिकारी व त्या मंडळाच्या मंडळामधील सर्व तलाठी व एक सशस्त्र धारी पोलीस असणार आहे व सह नियंत्रण अधिकारी म्हणून नाईब तहसीलदार महसूल हे या गस्त पथकाचे प्रमुख असणार आहेत .या कळंब मंडळाधिकारी व त्या मंडळातील सर्व तलाठी शस्त्रधारी पोलीस यांच्यासोबत गस्त घालणार आहेत खालील तक्त्याप्रमाणे नियोजन केले आहे कळंब मंडळ अधिकारी व मंडळ मधील सर्व तलाठी सोमवार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गस्त घालणार आहेत, मंगळवार ईटकुर मंडळाधिकारी व सर्व तलाठी, बुधवार येरमाळा मंडळ अधिकारी व सर्व तलाठी गुरुवार मंडळ अधिकारी गोविंदपुर व सर्व तलाठी शुक्रवार मंडळ अधिकारी मोहा व त्या मंडळातील सर्व तलाठी, शनिवार मंडळ मंडळ अधिकारी शिराढोण व त्या मंडळामधील सर्व तलाठी, रविवार मंडळ अधिकारी मस्सा व त्या मंडळामधील सर्व तलाठी या पथकांना जर अवैद्य गौण खनिज व उत्खनन वाहतूक करणाऱ्या शोध घेऊन सदरील वाहन संबंधित पोलीस ठाणे येथे जमा करण्यात यावे अशी आदेश तहसीलदार यांनी काढले आहेत. यामुळे संबंधित अवैद्य गौण खनिज करणाऱ्याचे दहावी दणाणले आहेत अशी माहिती कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आमच्या तालुका प्रतिनिधीला दिली आहे.