Rohit Pawar Tweet : लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंत आहे…. रोहित पवारांचे ट्विट!
rohit pawar mocks mahayuti : मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये चालू असलेल्या रस्सीखेच बाबत रोहित पवार यांच्याकडून ट्विटद्वारे महायुतीच्या नेत्यांना कोपरखळी मारली आहे
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित असतानाही अद्यापही महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न झाल्याने राज्याच्या राजकारणातील राजकीय मंडळीत कुजबुज चालू झाली आहे. एकीकडे महायुतीतच खलबते चालू असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. तर शिंदे गटाच्या काही नेत्यांचे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा असे म्हणणे असताना खुद्द एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो मुख्यमंत्री पदाकरिता चेहरा महाराष्ट्राला दिला जाईल त्याला संपूर्णपणे पाठिंबा असेल असे सांगून मागील दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या अचानक गावच्या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. अशी सर्व घडामोडी चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar Tweet यांनी ट्विट करत महायुतीच्या नेत्यांना कोपरखळी मारली आहे.
रोहित पवार यांच्या ट्विट!
लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंद आहे मुलीला मुलगा पसंद आहे, मात्र आता लग्नाच्या दिवशी मुहूर्तावर मुलगा लग्नास नकार देत आहे, कारण काय तर मंत्रिपदाच्या रुपात मिळणारा हुंडा मनासारखा मिळत नाही..
यात लग्नाला आलेले लोक (जनता) मात्र ताटकळत उभे आहे.दुसरं काय बोलणार!