क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Sex Racket : ठाण्यात देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश, एक अल्पवयीन मुलगी आणि आठ पीडित महिलांची सुटका

Thane Police Busted Sex Racket : ठाण्यात चालू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून अल्पवयीन मुलीसह 8 महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर नालासोपारा मधील दोन महिला दलालसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ठाणे :- मुंबई-नाशिक,मुंबई-गोवा महामार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग व्यवसाय फोफावला आहे. Maharashtra Lodged Sex Racket त्यातच याच परिसरातील एका लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापा मारून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात Rabodi Police Station गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या छापेमारीत अल्पवयीन मुलीसह आठ महिलांची सुटका करण्यात आली आहे. Thane Police Latest Crime News

सडकचाप रेस्टॉरंट कोलबाड रोड उथळसर ठाणे या ठिकाणी महिलांकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारावर तेथील वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून बनावट ग्राहक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाठवला होता. त्यानंतर दोन दलाल महिलेनी काही महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघा दलालांना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्या साथीदार असलेल्या पुरुष दलालाही पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्या तावडीतून एक अल्पवयीन मुलीसह आठ महिलांची सुटका केली असून तीन दलालांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ९६, १४३ (१), (३) सह लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, सन 2012 चे कलम 17 सह बाल न्याय अधिनियम, सन 2015 चे कलम 75, 87 सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम व सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. Thane Police Latest Crime News

अटक आरोपींची नावे


1.रईसा उर्फ खाला हनीफ खान (वय 46 धंदा महिला दलाल, रा. लिटील फ्लॅवर विदयालय जवळ, नालासोपारा पुर्व)

2.जोया अजरू‌द्दीन शेख (वय 25, धंदा महिला दलाल, रा. नालासोपारा पुर्व)

3.युसुफ अब्दुल रहिम शेख (वय 45)

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक,चेतना चौधरी, पोलीस उप निरीक्षक डी व्ही चव्हाण, पोलीस उप निरीक्षक‌ निलेश क्षिरसागर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस हवालदार पाटील, महिला पोलीस शिपाई पाटील, खरात,चांदेकर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0