Mumbai Latest Cyber Crime News : सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली रक्कम संबंधित बँकेकडून गोठविण्याकरिता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखे अंतर्गत 1930 हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे
Mumbai News : सायबर हेल्पलाईनमुळे मुंबईतील नागरिकांचे 24 तासांत 1 कोटी 31 लाख 33 हजार 128 रुपये वाचवण्यात यश आले. Mumbai Cyber Helpline Number सायबर फसवणुकीचे शिकार ठरलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील नागरीकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखे अंतर्गत Mumbai Police Crime Branch 1930 हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
२८ नोव्हेंबर रोजी सायबर फसवणुक झालेल्या वेगवेगळया तक्रारदारनी फसवणुक झाल्यानंतर 1930 हेल्पलाईनला संपर्क केला. हेल्पलाईनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ माहिती घेऊन तात्काळ संबंधित बँकेशी पाठपुरावा करत रक्कम गोठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, मरीन लाईन्स मुंबई येथे खाजगी कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार पाहणारे तक्रारदार यांना त्यांच्या मालक याचे नाव हे बनावट व्हाट्सअप द्वारे प्रोफाइल तयार करून कंपनीचे कामकाजाकरिता यांचे 85 लाखांचे ट्रांजेक्शन करण्यास भाग पाडले होते. तसेच इतर प्रकरणात गुन्ह्यांमधील नागरिकांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी एक कोटी 31 लाख 33 हजार 128 रुपये असे विविध बँकेचे रक्कम गोठविण्यात यश आले आहे. तसेच, नागरिकांनीही सायबर फसवणुकीची शिकार झाल्यास तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे,शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम प्रा. सायबर पोलीसठाणे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक बावरकर यांच्या 1930 हेल्पलाईन पथक, यांनी पार पाडली आहे.