महाराष्ट्र
Trending

Mumbai Drug News : 70 लाख किंमतीचे 350 ग्रॅम वजनाचे एम.डी ( मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त ; नायजेरियन महिलेला अटक

Mumbai Worli Unit Caught Nigerian Women With Drug : मुंबई वरळी युनिटने 70 लाख 350 ग्रॅम एमडी जप्त करत एका नायजेरीयन महिलेला अटक केली आहे.

मुंबई :- मुंबईतील आग्रीपाडा परिसरात मेफेड्रॉन (एम.डी) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने Worli Police Unit अटक केली आहे. या नायजेरियन महिले कडून पोलिसांनी 70 लाख किंमतीचे 350 ग्रॅम वजनाचे एम.डी अंमली पदार्थ जप्त केला आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव इमा स्टेला उर्फ ट्रेझर पीटर (34 वय रा. नायजेरियन) असे आहे. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अंमली पदार्थ मुक्त समाज बनवण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून कठोर पावले उचललेली आहे. या अनुषंगाने राज्यसह मुंबई शहरातील अंमली पदार्थ खरेदी विक्री तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उभारला आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी वरळी युनिटला मिळालेल्या माहितीनुसार वाय एस सी ए रोड आग्रीपाडा मुंबई या ठिकाणी एक परदेशी महिला संशयितरित्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली असता एक महिला संशयधरित्या आढळून आले आहेत. पोलिसांनी परदेशी महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे 350 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी महिलेच्या विरोधात कलम ८ (क) सह 22 (क) एन. डी. पी. एस. ॲक्ट 1985 सह कलम 14अ, (ब) परदेशी नागरीक कायदा 1946. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली वरळी युनीट यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0