क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Traffic Police : अपघात टाळण्याकरिता पोलिसांकडून हेल्मेट सक्तीचे आदेश, पुण्यात अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त

Helmets mandatory for bike riders in City : वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले

मुंबई :- राज्यभरात दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहे. दुचाकीस्वारच नाही तर सहप्रवाशांवरही आता हेल्मेट लागणार आहे. विनाहेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Helmets mandatory for bike riders हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला असल्याने चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

राज्यात दुचाकीस्वाराचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. Mumbai Police पोलिसांकडून मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहे.पुणे शहरात 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यान 271 अपघात झाले. त्यात 278 जणांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0