पुणे, दि. २८ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर :
पोकळे मळा, पारगे नगर येथे अवैध बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई आली असताना पुन्हा अवैध बांधकामे थाटण्याचा प्रयत्न होत आहे. पारगे नगर येथील स.न . ३८ येथील बांधकामावर महापालिकेकडून कारवाई झाली असताना पुन्हा बांधकाम करण्याचा प्रयत्न होत आहे. kondhwa news
याबाबत महापालिका प्रशासन उदासीनता दाखवत असून एकदा अतिक्रमण कारवाई झाली कि बिल्डरला पुन्हा बांधकाम करण्याचे अभय मिळाले असच काहीस चित्र सध्या दिसून येत आहे.
पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सदर प्रकरणाची दखल घेत निरीक्षकांची ‘संगीत खुर्ची’ राबविली असल्याची चर्चा आहे.