MLA Rahul Kul : आ. राहुल कुल यांच्या हस्ते दाखल्याचे वाटप
[ कुल यांच्या विशेष प्रयत्नांने ५० लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप ]
MLA Rahul Kul : दौंड, ता. ८ तालुक्यातील भांडगाव ( ता.दौंड ) येथे आमदार राहुल कुल Rahul Kul यांच्या हस्ते ५० लाभार्थ्यांना ऑनलाईन दाखल्याचे वाटप करण्यात आले. नंदीवाले समाजाच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील नंदीवाले समाज हा भटक्या जमातीमधील असुन तो आपल्या उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन आपली उपजीविका पार पाडतो. या समाजाच्या विविध प्रश्नांवर आ. राहुल कुल यांच्या ध्येक्षतेखाली भांडगाव येथे बैठक झाली होती.
यावेळी त्यांनी समाजाच्या प्रतिनिधीं समवेत झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्यावेळेस समाजातील विविध प्रश्नांवर समाजातील प्रतिनिधींनी आपल्या प्रमुख मागण्या यावेळी मांडल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने जातीचे प्रमाणपत्र ( दाखले ) देताना सन १९६१ पुर्वीचा पुरावा जोडण्याची अट शिथिल करून सन १०८० पासुनचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा व समाजाला इतर सोयी सुविधा मिळणे या मागण्यांचा समावेश होता. सर्व नंदीवाले समाज व भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने कुल यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कुल यांच्या बरोबर रामदास दोरगे, रविंद्र जाधव, अंबादास पवार, शाम कापरे, विजय दोरगे, संदिप दोरगे, व नंदीवाले समाजाचे प्रतिनिधी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.