मुंबई
Trending
Panvel News : खारघर सेक्टर ३४ मधील आग विझवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांचा पुढाकार
पनवेल जितिन शेट्टी : खारघरमधील फरशीपाडा सेक्टर 34 इंटरनॅशनल फुटबॉलच्या आवारात भीषण आग लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाचे युवा नेते व होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ सिडको अग्निशमन दलाला फोन करून तातडीने येण्यास सांगितले. जास्त वेळ वाया न घालवता सिडको अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाच मिनिटांत आग आटोक्यात आणली. यावेळी मदतीसाठी मिराज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 3 अध्यक्ष शेहबाज शेख, सोहेल शेख आदी उपस्थित होते. वेळ वाया न घालवता आग विझवण्यात सिडको अग्निशमन दलाने तत्पर सहकार्य केल्याबद्दल रमजान शेख यांनी सिडको अग्निशमन दलाचे आभार मानले.