छ.संभाजी नगरछत्रपती संभाजी नगर

Sanjay Shirsat : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांचा मुख्यमंत्री बाबत मोठा दावा

Sanjay Shirsat Reaction On Maharashtra Election Exit Poll | Guwahati Part Two : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाटते की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील

छत्रपती संभाजीनगर :- विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. आता 23 नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहे. त्यापूर्वी आलेल्या एक्झिटपोलमध्ये राज्याच्या सत्तेची सूत्र महायुतीकडे जाणार असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीला आपली सत्ता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य येत आहे. आता शिवसेना नेते संजय शिरसाट Sanjay Shirsat यांनी राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत माहिती दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, निकालानंतर महायुतीचे नेते एकत्रित बसून ठरवणार आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे. सध्या आलेला एक्झिट पोल हा सर्वे आहे. अजून 23 तारखेचा निकाल लागू द्या. परंतु आम्हा सर्वांना आणि राज्यातील सामान्य नागरिकांना वाटते शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी 2-4 अपक्षांची आवश्यकता पडली तर आम्ही त्यांची मदत घेऊ. परंतु आम्हाला इतरांची मदतीची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ते 22 तारखेलाही सरकार स्थापन करू शकतात. 23 नंतर आमचे सरकार स्थापन झाल्यावर ते सिल्वर ओकवर प्रतीसरकार स्थापन करतील. तसेच आता जे काही बाकीचे राहिलेले आहेत त्यांनी हिमालयात जायचे आहे.

महायुतीची सत्ता येणारच

महायुतीची सत्ता तर 100% येणार आहे. त्याबद्दल काही वाद नाही. परंतु एक रिस्क नको म्हणून एखाद्याचे मन दुखवू नये म्हणून सर्वच अपक्षांच्या संपर्कात आम्ही असतो. आता अडीच वर्षात जी कामे करू शकलो नाही, ती येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात करून दाखवू. भंकसगिरी करण्यात आम्ही वेळ घालवणार नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, एखाद्या सभेमध्ये सांगायचे की आम्ही अडीच वर्षात हे काम केले, ते काम केले. कोरोनाचा गुणगान गायले जाते. त्या काळात घरातच बसले आणि म्हणतात आम्ही काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0