Sanjay Raut : एक्झिट पोलवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, सत्ता स्थापन करण्याचा केला दावा
Sanjay Raut Latest News : एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे ; खासदार संजय राऊत
मुंबई :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया 20 नोव्हेंबरला पार पडली आहे. आता प्रतीक्षा आहे की, मतमोजणीची म्हणजेच कोणाचे सरकार येणार कोण सरकारवर दावा ठोकणार या सर्व गोष्टींची आता राजकीय मंडळीसह महाराष्ट्राचा देशभराचे लक्ष लागले आहे. पक्ष फुटी रद्द ही पहिल्यांदाच निवडणूक होणार असून यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि भाजपा असा सामना रंगला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरस लागली असून काल सायंकाळी सहा नंतर मतदानाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील एक्झिट पोल चालू झाले. एक्झिट पोलवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की एक्झिट पोल हा सर्वात मोठा फ्रॉड आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की सत्ता स्थापनेचा दावा अमित करू महाविकास आघाडीला यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत 160 ते 165 जागा मिळतील असे भाकीत संजय राऊत त्यांनी व्यक्त केले आहे.
एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 60 च्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले. लोकसभेला 400 पार पण काय झाले आपण पाहिलं. लोकांनी मतदान केले ते गुप्त असतं काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्व करतात. मविआ. 26 तारखेला संध्याकाळ पर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो. मविआला 160-165 जागा एकत्रित निवडून येत आहे. त्यामुळे एक्झिट पोल वरती कोणीही विश्वास ठेवू नये.आम्ही 23 तारखेला ही सत्तेवर दावा करू, असं संजय राऊत म्हणालेत.
खासदार संजय राऊत म्हणाले की,सत्तेचा चाव्या येतात की फक्त कुलूप येणार 72 तासाने ठरेल. प्रचंड पैसे आणि यंत्रणा गैर वापर केला आहे. पैशापेक्षा महत्वाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आहे. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले. आमचं स्पष्ट होते की महारष्ट्र की अदानी हवा आहे. ट्रम्प प्रशासनाने अदानी विरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. 250 मिलियम डॉलरचा भ्रष्टाचार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संगमत करून भ्रष्टाचार करुन जागा आणि टेडर बळकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासन प्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.