क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Drug News : नवी मुंबईत 5.62 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, 2 नायजेरियन नागरिकांना अटक

The Anti-Narcotics Cell (ANC) in Navi Mumbai has arrested two Nigerian nationals : 5.62 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह दोन नायजेरियन नागरिकांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.मेफेड्रॉन आणि कोकेन हा अंमली पदार्थ जप्त


नवी मुंबई महाराष्ट्र मिरर मयुरेश गडकर :-
नवी मुंबईत 5.62 कोटी रुपयांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात Navi Mumbai Police Caught 5 Corer Worth Drugs आले आणि दोघांना त्यांची जागा भाड्याने दिल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.एका माहितीच्या आधारे कारवाई करत, अंमली पदार्थ विरोधी सेलने शनिवारी तळोजा येथील निवासी संकुलावर छापा टाकून दोन नायजेरियनांना कोकेन आणि मेफेड्रोनसह पकडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. Navi Mumbai Police Latest News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप निगडे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि, तळोजा पोलीस ठाणे Taloja Police Station हद्दीतील, ” शिर्के बिल्डींग, धरणा कॅम्प, तळोजा, नवी मुंबई येथे नायजेरीयन इसम यांनी त्यांचे राहते घरामध्ये मेफेड्रॉन व कोकेन या अंमली पदार्थाची विक्रीकरीता साठवणुक करून ठेवली आहे”

पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने भाउऊसाहेब ढोले, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदशनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू, निलेश धुमाळ, पोलीस हवालदार बनकर, तायडे,दोरे, लोखंडे, पवार, पाटील, पोलीस नाईक म्हात्रे अहिरे, पोलीस नाईक फुलकर, महिला पोलीस नाईक पाटील, महिला पोलीस शिपाई पगारे, शेळके, महिला पोलीस शिपाई पाटील पोलीस शिपाई जयकुमार पाटील यांनी त्या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकला असता ओनयेका हिलरी इलोडिन्सो (Onyeka Hillary lodinso) (वय-25,रा.धरणा कॅम्प, नवी मुंबई, मुळ देश नायजेरीया) याचे ताब्यातून एकुण 5 कोटी 62 लाख 70 हजार रूपये किंमतीचा 2 किलो 42 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन व 174 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ बेकायदेशिर विक्री करण्याकरीता बाळगला असताना मिळून आला आहे.चिडीबेरे ख्रिस्तोफर मुओघालु (Chidiebere Christopher Muoghalu) (वय-40 वर्षे,रा
स, शिर्के बिल्डींग, धरणा कॅम्प, नवी मुंबई, मुळ देश नायजेरीया) हा त्याची पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील राहत असताना मिळून आला. त्यांचे विरूध्द तळोजा पोलीस ठाणे येथे , एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 21 (क), 22 (क) सह बी. एन.एस. कायदा 2023 चे कलम 221,224 सह परदेशी नागरीक कायदा 1946 चे कलम 14 (क) व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट 1939 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Police Latest News

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त,संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),अमित काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी नवी मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याचे व त्याचा व्यापार व सेवन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यांच्या कारवाईनंतर पोलिसांनी दोन आरोपींना 17 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्यांची 19 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. तसेच दोन्ही रूमचे मालक रमेश पावशे व नामदेव ठाकुर यांना देखील गुन्हयामध्ये आरोपी करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0