Pune Police Seized 4 Gavathi Pistol : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे बाळगणाऱ्या तिघांना अटक, एका अल्पवयीन मुलाचा सहभाग,4 गावठी पिस्टल,6 जिवंत काडतुसे आणि 2 दुचाकी वाहन जप्त
पुणे :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी Pune Police सराईत 4 पिस्तुले, तसेच 6 काडतुसे जप्त केली आहे.कोंढवा पोलीस ठाण्याचे Pune Kondhwa Police Staion विनय पाटणकर यांचे आदेशाने कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चार जण ॲक्टिवा काळ्या रंगाची हिरो होडा स्प्लेंडर दुचाकी वरून खडीमशिन चौक येथून कात्रजच्या दिशेने जाणार असून त्यांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल व काही जीवंत काडतुसे आहेत.” अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने होती. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना कळविली असता त्यांनी योग्यत्या सुचना देवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.पोलिसांच्या पथकाने सापळा लावून स्वप्नील दगडु भिलारे, (26 वय , रा. विठ्ठल मंदिर शेजारी, विठ्ठलवाडी, पौंड, पुणे),सलमान शेरखान मुलाणी,(34 वय, रा. चिन्मय हॉटेल समोर, खाटीक ओढा, पौंड, पुणे ) आदित्य संदिप मत्रे, (वय 19 भरेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) एक विधी संघर्षग्रस्त बालक असे असल्याचे सांगितले.त्यांच्याकडून देशी बनावटीच्या चार पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले असता त्यामध्ये एक जण अल्पवयीन आरोपी असल्याने त्याला पोलिसांनी त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. तर उर्वरित तीन आरोपींच्या विरोधात कोंडवा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही मोटरसायकल जप्त केल्या असून आरोपींच्या ताब्यातील चार देशी बनावटीचे पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख 58 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-5,ए. राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त ., वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक गुन्हे रौफ शेख यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, सागर भोसले व शाहिद शेख यांच्या पथकाने केली आहे.