Vartak Nagar Police Arrested Chain Snatcher : ठाणे येथील सोनसाखळी चोरीच्या कारवाईत सराईत चोरटा समोर आलं आहे. रामनगर येथे राहणारा युगेश बळवंत यादव (34 वय) असे चोरट्याचे नावे आहे
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या Thane हद्दीत वाढत्या सोनसाखळी गुन्ह्यांना Thane Chain Snatcher आळा घालण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याच्या Thane Police तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चिंतामण आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपीला रामनगर, श्रीनगर, ठाणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले आहे.अटक आरोपींकडून 35 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र) हस्तगत करण्यात आले आहे. Thane Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलु रमेश यादव,( वय 36, रा. उपवन, ठाणे.) या 11 नोव्हेंबरच्या सुरारास मीलन हील बील्डींग येथील स्वामी समर्थ मठाला लागुन असलेल्या जंगलातील पायवाटेने येत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ढकलुन त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने खेचुन घेवुन तो स्वामी समर्थ मठाचे बाजुलगत असलेल्या जंगलात पळून गेला होता. अशी तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.पोलीसांनी आरोपीच्या विरोधात भा.न्या.सं. कलम 309(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून रामनगर परिसरातून युगेश बळवंत यादव याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र ही जप्त केले आहे. Thane Police Latest News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे, तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व्हि. जे. चिंतामण, पोलीस हवालदार जाधव,महाडिक, राठोड, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस शिपाई सौदागरे, पोलीस शिपाई नागरे यांनी केली आहे. Thane Police Latest News