Kalyan Police News : नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टाेळीचा भांडाफोड; 3 महिलांना बेड्या,आईचा हि सहभाग
Kalyan Crime News : नवजात बाळांची खरेदी विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन महिलांना आणि एक पुरुष यांना अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या धक्कादायक म्हणजे या कटामध्ये आईचा हि सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण :- 42 दिवसांच्या नवजात बाळांची खरेदी विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये आईचा हि सहभाग असल्याचे पोलिसांच्या Kalyan Police चौकशीत समोर आले आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडून Mahatma Phule Police of Kalyan या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. Kalyan Latest News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरात राहणाऱ्या वैशाली आणि त्यांच्या काही साथीदार महिला या नवजात बालकाची विक्री (तस्करी) करण्यासाठी कल्याण येथील रामदेव हॉटेल सदानंद चौक परिसरात येणार आहेत. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पथकाने सापळा रचला होता. पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेल्या 42 दिवसांच्या बालकांचं 4 लाखांत खरेदी विक्री करणाऱ्या असल्याचा सौदा झाला होता.प्रथम बालकांस पाहून त्यानंतर पैसे घेवून या असं सांगितलं होतं. Kalyan Police Latest News
चार आरोपींना अटक, बालकाला निला बालसदन, अंबरनाथ येथे ठेवले
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक स्थापन केले. पथकाने लागलीच कारवाई करून आरोपी वैशाली किशोर सोनावणे, (वय 35 वर्षे, रा. कोपररोड, विष्णुनगर, डोबिवली दलाल व पैसे स्विकारणारीमुळ गाव मालेगाव, जि. नाशिक), दिपाली अनिल दुसिंग, (वय 27 रा. सिध्दार्थ नगर झोपडपट्टी, कोपररोड, डोबिवली पश्चिम, मुळ.नाशिक) रेखा बाळु सोनावणे, (वय 32, धंदा भिक मागणे, रा. कल्याण रेल्वे स्टेशन, प्लॅट फॉर्म नं.1 बाळाची आई) किशोर रमेश सोनावणे, (वय 34 वर्ष, व्यवसाय-रिक्षा चालवणे, रा. सिध्दार्थ नगर झोपडपट्टी, विष्णुनगर, डोबिंवली पश्चिम मुळश मालेगाव, जि. नाशिक) यांना सदर बाळ बनावट ग्राहकाला विकत असताना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी चारही आरोपी यांचे विरुध्द महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 143, 3(5) सह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 81 व 87 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा करीत आहे. ताब्यात घेतलेले 42 दिवसाच्या बालकास तसेच तिचा 5 वर्षाचा भाऊ यांना जननी आशीष बालगृह, डोंबिवली पश्चिम येथे व त्याच बालीकेच्या 2 बहीणी वय अंदाजे 9 वर्षे व 7 वर्षे यांना सुरक्षिततेकरीता निला बालसदन, अंबरनाथ येथे ठेवण्यात आलेले आहे.
पोलीस पथक
शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, धनाजी शिरसाठ, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, क्षिरसागर, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालगुडे, भोसले, मोहिते, पोलीस हवालदार पाटील, पोलीस अंमलदार यादव, महिला पोलीस अंमलदार खरात, थोरात, पाटील, चांदेकर, पोलीस शिपाई घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.