Mira Road Crime News : Share market App मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक
Mira Road kashigaon Police Cyber Crime Branch News : काशीगाव सायबर गुन्हे कक्षाने तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर 5 लाख रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे
मिरा रोड :- Share market App मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात Online Fraud आलेल्या प्रकरणातील 5 लाख रक्कम काशीगाव पोलिसांच्या सायबर गुन्हे Mira Road Kashigaon Cyber Crime Unit कक्षाने परत मिळवून दिली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या पप्पू प्रेमचंद झा यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली होती. फसवणुकीच्या अनुषंगाने झा यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवि, कलम 420 सह माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तक्रारदार यांची तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करून संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिगाव पोलीस ठाणेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या संपूर्ण रक्कम पाच लाख रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मिरारोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे तत्कालीन नेमणुक काशिगाव पोलीस ठाणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.