क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News: ठाणे पोलीस आयुक्त ; सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची जनजागृती

Thane Police Cyber Crime Awareness : ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना जाहीर आवाहन!

ठाणे :- आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा करण्यामध्ये वाढ होत आहे Cyber Crime गुन्हेगारांकडून व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मिडीयामधून सर्वसामान्य नागरीकांची वैयक्तिक माहिती मिळविली जाते. पोलीस अधिकारी आणि तपास यंत्रणेतील अधिकारी यांचे सोशल मिडीयामधील फोटो स्टेटसवर ठेवून व्हॉट्‌सॲप मॅसेज तसेच व्हिडीओ कॉल करून, सोबत पोलीस कार्यवाही संबंधातील बनावट कागदपत्रे पाठवून नागरिकांना भिती दाखविली जाते आणि त्यांच्या बॅंक खात्यांची तपासणी करण्याचा बहाणा करून त्यांचे बॅंक डिटेल्स प्राप्त करून घेवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक केली जात आहे. यासाठी ठाणे पोलीस Thane Police Cyber Crime Awareness आयुक्तालयाकडून नागरिकांना आव्हान दिले आहे, तसेच नागरिकांना सायबर गुन्हेगारी पासून बचाव करण्यासाठी काही सूचना जारी करण्यात आले आहे. Thane Police Cyber Crime Awareness

पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचना

1.’मोबाईल कंपनी तुमचा फोन डिस्कनेक्ट करणार आहे’ असा कॉल आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये.

2.FedEx कुरियर कंपनीच्या नावाने पार्सल संदर्भात कॉल आल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देवू नये अथवा त्यांनी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवून कोणतीही कृती करू नये.

3.पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्याकडे आधार कार्डबाबत माहिती विचारल्यास अशा व्यक्तींना किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम, डेबीट कार्ड इ. ची माहिती देवू नये. .

4.पोलीस अधिकारी किंवा केंद्रिय तपास यंत्रणेचे अधिकारी बोलत आहे, तुमच्यासाठी आलेल्या पार्सलमध्ये अनाधिकृत मोबाईल सिमकार्ड आहेत, ड्रग्ज आहेत, तुमच्या विरूध्द गुन्हा नोंद आहे, तुम्हाला डिजीटल अरेस्ट करण्यात आली आहे’ अशी बतावणी करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याने अशा प्रकारचे कॉल आल्यास कोणताही प्रतिसाद न देता तात्काळ पोलीस तपास यंत्रणेशी संपर्क करावा.

5.WhatsApp, Instagram, Facebook यावर कोणत्याही अपरिचीत व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट किंवा‌ मेसेज प्राप्त झाल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देवू नये.

6.कोणत्याही ऑनलाईन पेमेंट वॉलेटची सुरक्षितता नियमीतपणे पडताळावी आणि पुर्णतः खातरजमा करून सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करावेत.

7.भारतीय सैन्य दलाची व्यक्तींच्या नावाने जुन्या वस्तू व फर्निचरची विक्री करण्याच्या जाहिराती देवून त्याद्वारे अनेक नागरीकांची आर्थिक फसवुणक झालेली आहे, तरी अशा जाहिरातींना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देवू नये.

8.आपला वापरता मोबाईल फोन क्रमांकाची सेवा अचानक बंद झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीशी अथवा कस्टमर केअरला कॉल करून खात्री करावी.

9.सोशल मिडीयावर आलेल्या कोणत्याही अनोळखी वेबसाईटला व्हिजीट करू नये अथवा कोणतीही लिंकवर योग्य खातरजमा केल्याशिवाय क्लिक करू नये.

10.आपल्या मोबाईल क्रमांकावर कोणत्याही अनोळखी इसमाने त्याचे बँक खात्यातुन चुकून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहे असा कॉल/मेसेज केल्यास त्यास त्वरीत प्रतिसाद न देता सदर रक्कम आपल्या बँक खात्यात आली आहे किंवा नाही याची प्रथम खातरजमा करावी व नंतर पुढील कार्यवाही करावी.

11.आपण आर्थिक फसवणूकीस बळी पडले असल्यास किंवा फसविले जाण्याची शक्यता वाटल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनयर तात्काळ कॉल करून आपली तक्रार नोंदवा किंवा शासनाचे www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करून तक्रार नोंदवावी. तसेच नजीकचे अथवा सोयीचे पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. असं आवाहन ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0