Mumbai Drug News : अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये मुंबई पोलिसांची विशेष मोहीम
•315 गुन्हेगारांची पोलिसांकडून उलट तपासणी, अकरा आरोपींना पोलिसांकडून अटक
मुंबई :- शहरात अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदीन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील सर्व पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित सर्व मुंबई शहरात कार्यवाही करीत आहेत. Mumbai Drug News
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व व्यापार प्रतिबंध करुन अंमली पदार्थ मुक्त मोहिम राबविली आहे. Mumbai Drug News
प्रस्तुत मोहिमेअंतर्गत मागील 24 तासात एनडीपीएस कायद्यान्वये 315 आरोपींची उलट तपासणी केली असून, 11आरोपींना अटक केली असून त्यामधील आठ आरोपींकडे गांजा, दोन आरोपीकडे एमडी, १ हेरॉईन पावडर, बांगूर नगर पोलीस ठाणे अंतर्गत 45 हजार चा Heroine Powder हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच भायखळा, घाटकोपर पोलीस ठाणे अंतर्गत एम.डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. Mumbai Drug News
मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील सदरची मोहिम राबविण्यात येईल Mumbai Drug News