मुंबईमहाराष्ट्र
Trending

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात दिग्गज नेत्यांचा राजकीय धुराळा!

Maharashtra Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे महत्त्वाचे नेते प्रचारासाठी मैदानात

मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीकरिता Maharashtra Assembly Election मतदानाला केवळ नऊ दिवस उरले असताना राज्यात आज पासून महत्त्वाच्या नेत्यांचा प्रचाराचा धुराळा उडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण राजकीय धुराळा पाहायला मिळणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राज्यभरात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात तीन जाहीर सभा होणार आहेत. मोदी यांची पुण्यातील एस.पी महाविद्यालयांच्या मैदानवर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्यावेळी पावसामुळे मोदी यांच्या सभेत विघ्न आणले होते. मात्र, यावेळी भाजपने या सभेची जय्यत तयारी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी पुण्यात करणार आहेत. पुण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज चिमूर, सोलापूर येथे देखील जाहीर सभा होणार आहेत.

आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील राज्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांच्या चिखली (जि. बुलडाणा) आणि गोंदिया येथे सभा होणार आहेत. राहुल गांधी आज हे येथून विरोधकांवर तोफ डागणार आहेत. राज्यात त्यांच्या झांजावाती प्रचार दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. परंतु राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा राज्यात होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा अकोला, अमरावती व नागपुरात आयोजित करण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उरले आले. 17 तारखे पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. 18 तारखेला प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत. त्यामुळे कमी दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन उमेदवारांपुढे आहे. 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी राहणार आहे. त्यामुळे शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले, ॲड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदि नेते हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0