Women’s Day Special Story : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी, ध्येयवेड्या शिक्षिकेची आभाळा ऐवढी जिद्द….
[ स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कर्तुत्व आणि स्री म्हणजे अडथळ्यावर मात…..कौतुकास्पद ! ध्येयवेड्या शिक्षिका शबनम डफेदार (Shabnam Dafedar) ]
Some Inspirational Women And Their Stories : दौंड, ता. ७ ( प्रतिनिधी हरिभाऊ बळी ) ता. 8 आपल्या देशातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे असा शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये संसदेत पारित करण्यात आला. भारतीय संविधानाची निर्मिती करताना देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे अशी तरतूद करुन ठेवली होती. माञ, मागील ७२ वर्षात देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळू शकलेले नाही. हे वास्तव आहे. यामध्ये स्थलांतरित मजूरांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. या स्थलांतरित मजूरांपैकीच एक घटक म्हणजे विटभट्टीवर काम करणारे मजूर. दरवर्षी हि कुटुंबे आपले गाव, जिल्हा, राज्य सोडून येणारे मजूर सोबत मुलांनासद्धा घेऊन येतात. या काळात या मुलांची शाळा पूर्णपणे बंद असते. त्यामुळे मुलांमध्ये प्रतिभा असूनही ती शिक्षणापासून तुटून जातात. आणि पिढानपिढ्या मजुरीच्या विळख्यात अडकून पडतात. International Women’s Day
रखरखत्या उन्हात, माती, पाणी, चिखल, चिखलात बरवटलेले हात, लोखंडी साचा, त्याच्यात मातीचा चिखल भरत असलेले भट्टीवरील मजूर. या मजुरांना मदत करणारी त्यांची मुले. भट्टी लावण्यासाठी गाडा ओढणे, एकावर एक विटा रचून त्याची भट्टी तयार करणे. भाजून तयार झालेल्या विटांची लाॅरी ट्रॅक्टरची ट्राॅली आपल्या आई-वडीलांसोबत भरणारी ही मुले. हातावर, तोंडावर मातीचा बसलेला थर. वरखडलेल्या वनांसारखे पांढरे पडलेले पाय. अशी विटभट्टीवरील काम करणाऱ्या मजुरांची आणि त्यांच्या मुलांची परिस्थिती. कुठल्याही विटभट्टीवर गेल्यास प्रत्येकाला बऱ्यापैकी असेच चित्र दिसेल. त्यामुळे आपल्या समाजातील दुर्लक्षित झालेल्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शालेय प्रवाहात रमवणं यासाठी शिक्षणव्यवस्थेत जे शिक्षक काम करत आहेत त्यांना बालरक्षक संबोधलं जातं. त्यामुळेच आपल्या समाजातील दुर्लक्षित झालेल्या मुलांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी विटभट्टीवरील शाळेचा खटाटोप सुरू आहे. International Women’s Day
मॅडम…आमच्या आई बा च्या कष्टांची जाणीव आम्हाला हाय… म्हणून आम्हाला पण शाळा शिकुन मोठं साहेब व्हायचं हाय….*वास्तव सत्य
नऊ वाजता कॉल आला मी शबनम बोलतेय दादा दौंडवरून ! मला बालरक्षक चळवळीत काम करायचे आहे आणि काय करता येईल ? आज प्रथमतः इंग्रजी माध्यमाच्या कायमविनाअनुदानित शाळेच्या मॅडमचे या कामाविषयी मला विचारणे झाले होते. घरापासून सात आठ किलोमीटरवर शाळा आणि मध्ये लागणाऱ्या विटभट्टया पण नेहमी सारखे पाहणे आणि समोर जाणे, आज विसपंचवीस मुले विटभट्टीवर काम करतांना दिसली. शबनम डफेदार विटभट्टीवर गेल्या मुलांच्या पालकाशी संवाद साधला पण मुकादम काय म्हणेल याबाबत थोडी भिती होती. जवळच असलेल्या शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्नही झाले परंतु मुले कुठेतरी हरवून जाईल या भितीने पालक इतरत्र पाठवायला तयार नव्हते, बस आता मनात संकल्प केला यांना इथेच शिकवायचे, विटभट्टीवर शिक्षक बनून .. जेमतेन पगार असलेला व्यक्ती कसा खर्च करेल पण दृढ संकल्प केला की यश हमखास मिळते. मुलांसाठी पाटया, वहया, जुने पुस्तकाची व्यवस्था केली. इतर मित्रांच्या सहाय्याने वस्तु मुलांना पुरविण्यात आल्या. मुले जाम खूश झाली. काही मुलांचे आधार कार्ड नव्हते ते जिथे शिकत होते तेथे संपर्क करून आधारकार्ड उपलब्ध करून घेतले व काहीना जवळच्या जि.प. शाळेत दाखल करून घेतले. मुलांना दाखल करून घेण्यात येणाऱ्या अडचणी यांनाही आल्या, कशासाठी या मुलांना शाळेत टाकता. पोर्टलवर नाव चढवतांना तकलिफ होते, ही मुले इतरासोबत कशी जुळवून घेतील नानाविध प्रश्नाचा भडीमार त्यांच्यासमोर व्हायचा मात्र त्यांनी ठरविले की आता आपण वरिष्ठाच्या मदतीने ही मुले दाखल करायची. त्यावेळेस वनवे साहेब गटशिक्षणाधिकारी दौंड यांनी सहकार्य केले. International Women’s Day
काल परवाची गोष्ट एका शाळाबाहय मुलांच्या प्रवेशासाठी गेले असता संबंधित शाळेने प्रवेश नाकारले. कित्येक वेळापासून त्या शिक्षकाला त्या समजावत होत्या परंतु ते ऐकायला तयार नव्हते का तर आधार कार्ड नाही कारण आधारकार्ड नसलेल्या मुलांची नोंदणी करतांना शिक्षकांना खूप अडचन जाते.
शबनमनी खूप विनवनी केली पण शेवटी अपयश आले आता आधारासाठी धावपळ सुरू झाली. असे संघर्ष करून त्यांनी पन्नासपेक्षा जास्त शाळा बाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणले . जवळपास तीनसे पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्याना त्यांनी शैक्षणिक साहित्य संस्थाच्या मदतीने दिले दिव्यांग मुलांसाठी त्या स्वखर्चाने अभ्यासगृह चालवतात. त्याचबरोबर त्यांनी दोन मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे .
कोळसा फोडणा-या हातात जेव्हा पाटी येते तेव्हा…
आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य घडते….👍🏻
आज विटभट्टीवर शिकवतांना एका मुलांने म्हटले, टिचर तुम्ही आम्हाला का शिकवता आम्ही तर कामगाराची मुले ! त्यावर शबनम डफेदार (Shabnam Dafedar) म्हणाल्या, तसे नाही तुम्ही कामगारांची नाही तर मानवांची लेकरे आहात आणि माझा कर्तव्य आहे तुम्हच्यासाठी काहीतरी करणे, हो मॅडम आमाले खूप शिकायचे आहे कारण नाही शिकले तर बापासारखे विटभट्टीवर काम करायला यावे लागे, आम्ही शिकून साहेब बनून आमच्या आईवडीलचे कामाचे ओझे उतरावयाचे आहे ! शबनम डफेदार त्या मुलांकडे पाहतच राहील्या काही न बोलता असे किती मुले असेल ज्यांचे स्वप्न आहे शिकायचे पण परिस्थितीने स्वप्नाना बंदीस्त करून टाकले आहे. मागील चार वर्षांपासून त्या उन्हातान्हात जावून तप्त वाऱ्याचा मारा झेलत विटभटीवर शिक्षणाचे धडे देत आहेत. मातृत्व, कर्तुत्व, आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या महान शक्ती म्हणजेच नारीशक्ती…अशा ध्येयवेडया बालरक्षक शिक्षिका शबनम डफेदार (Shabnam Dafedar) यांना मानाचा मुजरा ! International Women’s Day.