Cannabis Farm in Shirpur : पोलिसांची मोठी कारवाई: सव्वा दोन एकर शेतीमध्ये शिरपूर तालुक्यात गांजाची लागवड
Bandra Police Unit 8 Busted Cannabis Farm in Shirpur : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे युनिट यांची मोठी कारवाई ते 47 किलो गांजासह एकाला अटक
मुंबई :- अंमली पदार्थ विरोधक कक्ष, Anti-Narcotics Unit वांद्रे युनिट Bandra Police Unit 8 15 ऑगस्ट साकीनाका मुंबई परिसरात गस्तीदरम्यान एका व्यक्तीला अवैधपणे 40 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला होता.आरोपींविरुध्द अं.प.वि.कक्ष कलम 8 (क), 20(क) एन.डी.पी.एस. कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai Crime Branch’s Anti-Narcotics Unit conducts a major raid in Shirpur
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हयातील अटक आरोपी याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने धुळे जिल्हा येथे राहणारा पाहिजे आरोपी याचेकडुन गांजा हा अंमली पदार्थ घेतला असल्याचे सांगितले होते. त्यावरुन गुप्त बातमीदार यांचे मदतीने नमुद पाहिजे आरोपीचा शिरपुर, धुळे जिल्हा येथे शोध घेतला असता पाहिजे आरोपीचे मालकीचे भोईटी शिवारात, ता. शिरपुर, जि. धुळे येथे सव्वा दोन एकर शेतीमध्ये लागवड केलेला ‘गांजा’ मिळुन आला आहे.
एकुण 2774 किलो वजनाची गांजा या वनस्पतीची झाडे व 42.5 किलो वजनाचा ओलसर / सुका गांजा असा एकुन 2816.5 किलो वजनाचा कि.अं. 5.36 कोटी किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असुन गांजा शेतीची लागवड करणारा पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे.अंमली पदार्थ विरोधी कक्षाने यांनी धडक कारवाई करत भोईटी, (ता. शिरपुर, जिल्हा धुळे) येथे ‘गांजा’ ची लागवड केलेली शेती शोधुन त्यावर कारवाई करुन सदरवेळी एकूण 2816.5 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एकूण अं. किं. रू. 5.36 कोटी पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Crime Branch’s Anti-Narcotics Unit conducts a major raid in Shirpur
पोलीस पथक
विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, बांद्रा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिवन खरात यांचे नेतृत्वाखाली, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, पोलीस निरीक्षक नितीन केराम, सुरेश भोये, रविंद्र मांजरे, सपोनि, श्रीकांत कारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, फाळके व स्टाफ या पथकाने केली आहे.