क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

अंबरनाथ : गांजा विक्री करणार्‍या महिलेला अटक

Ambernath Police Arrested Ganja Seller Women : गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 51 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

अंबरनाथ :- गांजाची विक्री करणार्‍या एका महिलेला अंबरनाथच्या डी एस सी कंपनीच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. Ambernath Police पूजा जगदीश शर्मा (29 वय, रा. बुवापाडा अंबरनाथ पश्चिम)असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या ताब्यातून 51 हजार रुपयांचा 2 किलो 561 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. Ambernath Police Latest Crime News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अंमली पदार्थ विरोधी कसून चौकशी चालू असताना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे डि.बी पथकाचे पोलीस नाईक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद असलेल्या डीएमसी कंपनीच्या मागे एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी बातमीची पडताळणी करून दोन पंचासह त्या ठिकाणी छापा मारला असता त्या महिलेच्या ताब्यात 51 हजार रुपयांचे 2.561 किलोग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. Ambernath Police Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग शैलेश काळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक काजारी, महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव , महिला पोलीस नाईक म्हषाळ, डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार संजय चव्हाण, गावित, पोलीस नाईक हेमंत पाटील, पोलीस शिपाई सुर्यवंशी,मुंढे,गवळी यांनी केलेली आहे. Ambernath Police Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0