Maharashtra State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई, अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या 226 गुन्हे दाखल
Maharashtra State Excise Department News : उपनगर अधीक्षक नितीन घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार आचारसंहिता चालू झाल्यापासून राज्यात मुंबई शहर आणि उपनगर मध्ये मद्य वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्या असल्याचे सांगितले
मुंबई :- राज्यात 15 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक विधानसभेच्या निवडणुका Vidhan Sabha Election जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राज्यभरात आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पश्चिम Maharashtra State Excise Department व पूर्व उपनगरात अवैध मद्य वाहतुकीबद्दल 226 गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 227 जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 92 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे, असे उपनगर अधीक्षक नितीन घुले यांनी सांगितले.
मुंबईत येणारे सर्व टोल नाके तसेच वांद्रे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रेनमधून अवैध मद्य वाहतूक केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गस्त वाढविण्यात आली आहे. रेल्वेगाडीतून येणारी पार्सल, ऐवजाचीही नियमित तपासणी करण्याची विनंती अधीक्षक यांच्याकडून रेल्वे व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून आढावा घेतला जात आहे. याशिवाय उपनगरातील 26 मतदारसंघात निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध मद्याविरोधात कारवाई करण्यासाठी 16 भरारी पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.