क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Drug News : 24 तासात मुंबईत लाखोंचा कोकेन जप्त, आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत दोन कोटी पर्यंत अंमली पदार्थ जप्त

Mumbai Police Seized 94 lakh Worth Drugs : आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई तब्बल एक कोटी 94 लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे

मुंबई :- राज्यात विधानसभा निवडणुका Vidhan Sabha Election जाहीर झाल्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून Mumbai Police चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मागील 24 तासात 18.1 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी Drug Seized In Mumbai जप्त केले आहे.

पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मागील 24 तासांमध्ये धारावी,मानखुर्द,घाटकोपर,खार, वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत 16 जणांना अंमली पदार्थ सेवन करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई शहरात 121 गुन्हे दाखल करण्यात आल्यावर तब्बल एक कोटी 94 लाख 97 हजार 725 रुपयाची 77.53271 एवढा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत एकूण 6,810 दाखल केले असून 6,794 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी 24 तासात आत्तापर्यंत 310 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचे उलट तपासणी केली असून,5 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एमडी 1 आरोपी, गांजा 3 तीन आरोपी, ‌कोकेन 1 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे सूचनेनुसार, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदीन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळ पोलीरा उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित मुंबई शहरात कार्यवाही करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0