Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 च्या हद्दीत “ऑपरेशन ऑल आउट”
Mira Bhayandar Police Mission All Out : ऑपरेशन ऑल आउट, कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांकडून मोठ्या कारवाया, 5 तडीपार आरोपींना अटक!
मिरा रोड :- राज्यात राजकीय रणधुमाळी उडाली असतानाही यंत्रणा मात्र सतर्क आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्ता करिता मैदानात उतरला आहे. पोलिसांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या कारवाई केल्या जात आहे. अशीच कारवाई मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 Mira Bhayandar Police हद्दीत पोलिसांनी “ऑपरेशन ऑल आऊट”, कोंबिंग ऑपरेशन Mission All Out अंतर्गत मोठी कारवाई करत पाच तडीपार Mira Bhayandar Tadipar Criminal Arrested आरोपी अटक केली आहे.
पोलीस यंत्रण
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय व परिमंडळ-1 अधिनस्त विभागीय 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक 14, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक- 38 व पोलीस अंमलदार 140 यांनी सदर कारवाईत मोठा फौजफाटा तैनात होता.
ऑल आउट कोबिंग ऑपरेशन, कारवाई!
ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान पाहीजे/फरारी 7 आरोपीत मिळून आले त्यांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आलेली आहे एन.डी.पी.एस, कायदयान्वये अंमली पदार्थाचे सेवन केल्याबाबत 7 इसमावर केसेस करण्यात आल्या, 7 इसमावर बी.एन.एस.एस. प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली, दारुबंदी कायद्यान्वये 10 गुन्हे दाखल करण्यात आले, कोप्ता अंतर्गत 2 एन.सी. दाखल केल्या, 12 हिस्ट्रीशिटर तपासले, 05 तडीपार इसमाना तपासले, 51 हॉटेल व लॉजेस तपासले. 7 पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. नाकाबंदीच्या वेळी मोटार वाहन कायदया अन्वये 44 केसेस करण्यात आल्या आहेत.