Panvel Crime Branch 2 Solve Murder Mystery: गुन्हे शाखा कक्ष-2, पनवेल यांची कारवाई , बेपत्ता हत्येचा गुन्हा उघड करुन आरोपी जेरबंद
पनवेल :- पनवेल तालुक्यातील मोरबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या एका शेत तलावात अज्ञात इसमाची हत्या Panvel Murder करून टाकण्यात आले होते. गुन्हे शाखा कक्ष-2, पनवेल विभागाच्या पथकाला यश आलं आहे. Panvel Crime Branch 2 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याकुब युनुस खान,( वय 60 , रा. रेहमान नगर, वावंजे, ता. पनवेल) हे 26 ऑक्टोबरपासुन बेपत्ता झाले असल्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसींग 27 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आली होती. 29 ऑक्टोबर रोजी बेपत्ता इसम याकुब खान यांची स्कुटी ही मोरबे गावाच्या दिशेने जाणा-या एका शेत तलावात टाकल्याचे आढळून आले होते. यावरुन बेपत्ता त्याच्यासोबत काहीतरी संशयास्पद कृत्य घडले असण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पोलिसांची कारवाई
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे परिवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष -2 पनवेल, नवी मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांची सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास या आधारे बेपत्ता इसमाचा शोध घेण्यासाठी व त्याच्या पुर्व इतिहासाची माहिती घेण्यासाठी 2 पथके तयार केली.त्यांनी केलेल्या तपासात 26 ऑक्टोबर रोजी मिसींग याकुब खान हा त्याचे स्कुटी वरून तो एन. के. गार्डन येथे बोलत उभा असलेल्या अनोळखी व्यक्ती सोबत मोरबे गावाच्या दिशेने गेल्याचे व काही वेळाने त्याच स्कुटी वरून मागे बसलेला अनोळखी व्यक्ती एकटाच परत आल्याचे तांत्रीक तपासात निष्पन्न झाले होते. त्या अनोळखी हा श्रीकांत रामअकबल तिवारी,( रा. एन. के. गार्डन, वावंजे, ता. पनवेल,) असल्याचे निष्पन्न झाले व तो उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यातील विविध ठिकाणी फिरत असल्याचे निष्पन्न झाले होते.
आरोपीला उत्तर प्रदेश मधून अटक
2 ऑक्टोबर रोजी बेपत्ता व्यक्ती याकुब खान याचा मृतदेह मोरबे गावचे हदित मिळुन आल्याने सदर प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे नोंद करण्यात आलेला आहे. यातील संशयित इसम श्रीकांत तिवारी हा कोणत्याही प्रकारचा मोबाईल किंवा संपर्काचे साधन न वापरता उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यात फिरत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे जिकरीचे झाले होते. तांत्रिक तपासावरुन तो मुंगरा बादशहापूर येथे नातेवाईकांस भेटण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जावून सापळा रचून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतले असता उडवाउडवीची उत्तरे देवून कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यास दिनांक 5 नोव्हेबर रोजी नातेवाईकांसह कक्ष-2 कार्यालयात बोलावून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, याकुब खान याने आरोपीची पत्नी व वडीलांबदद्ल वारंवार अपशब्द वापरल्यामुळे, त्या रागाच्या भरात याकुब खान याला जिवे मारल्याची कबुली दिल्याने त्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढिल तपास पनवेल तालुका पोलीस ठाणे करीत आहेत. तसेच श्रीकांत तिवारी याला अटक करण्यात आली असून त्याला 11 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे परिवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक, मानसिंग पाटील, अभयसिंह शिंदे, प्रताप देसाई, माधव इंगळे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी केली आहे.