मुंबई

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यघटनेवरून काँग्रेसवर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे

CM Eknath Shinde On Congress : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. बुधवारी (6 नोव्हेंबर) प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी संविधानाबाबत विरोधी पक्षांना धारेवर धरले.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते प्रचार करत आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde हेही आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) चेंबूर विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार तुकाराम काटे Tukaram Kate यांचा प्रचार केला. यावेळी त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरले.

चेंबूर विधानसभा मतदारसंघात Chembur Vidhan Sabha आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांनी संविधानासंदर्भात मोठे वक्तव्य केले.”जब तक सूरज-चांद रहेगा तब तक बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा.” आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबाबत संविधानासंदर्भात वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

विधानसभा निवडणुकीच्या गदारोळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपले संविधान निळे आहे, पण राहुल गांधींचे संविधान लाल आहे’ असा आरोप केला. राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे.

भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बुधवारी (6 नोव्हेंबर) काँग्रेस खासदार राहुल गांधी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीच्या विरोधात असून संविधानाच्या रक्षणाचे नाटक करत असल्याचा आरोप केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली राज्यघटना ही केवळ पुस्तक नसून जीवनपद्धती आहे, असे राहुल गांधी यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) नागपुरातील संविधान सन्मान परिषदेत सांगितले.आरएसएस आणि भाजप जेव्हा संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते देशाच्या आवाजावर हल्ला करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0