क्राईम न्यूजठाणे
Trending

Dombivli Police News : डोंबिवलीत वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका, 19 वाहनचालकांवर फौजदारी कारवाई

Dombivli RTO Officer Take Action On reckless drivers : राज ठाकरे यांच्या भाषणाचा इम्पॅक्ट कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर राज ठाकरे यांनी केली होती टीका, पोलीस यंत्रणा कडून 24 तासात कारवाई 19 बेशिस्त वाहनचालकांवर फौजदारी कारवाई

डोंबिवली :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी सोमवारी, 4 नोव्हेंबरला यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या Kalyan-Dombivli Municipal हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत खडे बोल सुनावले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणांनी तात्काळ ॲक्शन घेत बेशिस्त वाहतूक Dombivli RTO Officer Take Action करणाऱ्या 19 वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. On reckless drivers कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेच्या Kolsevadi Traffic Control Branch पोलिसांनी मानपाडा रोडला वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन केले होते. या नियोजनाच्यावेळी काही रिक्षा आणि कार चालकांनी सांगावच्या साईबाबा मंदिर ते मानपाडा चौकादरम्यान विरूद्ध दिशेने वाहने चालवून मानपाडा रस्त्यावर अर्धा तास वाहतूक कोंडी केली. अशा पद्धतीने वाहने चालविणाऱ्या 19 वाहनचालकांच्या विरोधात कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदाराच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी नियोजन केले होते. काही बेशिस्त चालकांनी मानपाडा रोडला असलेल्या सांगावच्या साईबाबा मंदिर ते मानपाडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर विरुद्ध दिशेने वाहने आणून अभूतपूर्व वाहतूक कोंडी केली होती. बेशिस्त वाहन चालकांमुळे मानपाडा रोडने कल्याण-शिळ महामार्गाकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मालवाहू वाहनांसह इतर प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. विरुद्ध मार्गिकेतून वाहने चालवून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा, तसेच धोकादायक परिस्थिती निर्माण करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाचे हवालदार सुनील उगलमुगले यांच्या तक्रारीवरून बेशिस्त 19 चालकांविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात रस्ते सुरक्षा मानकाचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये रिक्षावाल्यांसह कार चालकांचा समावेश आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये Manpada Police Station भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 54,126 (2), 281,285 सह एमव्हीडीआर 4/122, 17 (अ), 174/177 मोटार वाहतूक कायदया सह रस्ता सुरक्षा मानके नियम कलम 190 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर पंकज शिरसाठ यांनी आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0