मुंबई
Trending

Uran Vidhan Sabha : शेकाप युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी ग्रामीण भागात घेतली प्रचारात आघाडी

पनवेल महाराष्ट्र मिरर : शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे Pritam Mhatre यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने तरुण वर्ग शेकापच्या शिट्टीचा प्रचार मोठ्या प्रमाणात करत असल्याने प्रितम म्हात्रे यांचा विजय निश्‍चितच मानला जात आहे. Panvel Latest News

उरण मतदार Uran Lok Sabha Election संघातील प्रामुख्याने ग्रामीण भाग व त्यामध्ये शेकापक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात असणार्‍या तारा, बारापाडा, डोलघर, शिरढोण आदी भागात आज प्रचार करताना मोठ्या प्रमाणात तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रचारात सहभागी झाले होते व परिसर शिट्टीने दुमदुमून गेला होता. प्रितम म्हात्रे यांनी थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेत घराघरात जावून आपल्याला मतदान करावे असे मतदार राजाला आवाहन केले व या आवाहनाला ग्रामस्थ बांधवांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Panvel Latest News

शेकापक्षाच्या माध्यमातून या परिसरात करण्यात आलेली विकासकामे तसेच प्रितम म्हात्रे यांचे पिताश्री जे.एम.म्हात्रे यांनी केलेली वेळोवेळी गोरगरीबांना मदत याची आठवण आजही ग्रामीण भागामध्ये तेथील रहिवाशी काढत आहेत. त्यामुळे याची परतफेड प्रितम म्हात्रे यांना विजयी करून करणार असल्याच्या भावना सुद्धा या नागरिकांमध्ये आहेत. उरण मतदार संघात आता 14 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही तिघांमध्ये असणार आहे. आज तरुणांना आकर्षित करणारे व्यक्तीमत्व म्हणजे प्रितम म्हात्रे यांच्याकडे या भागातील जनता मोठ्या आशेने व भावी आमदार म्हणून पाहत आहेत. एक तरुणाला संधी देवून या भागाचा विकास करावा अशी ठाम भावना अनेक गावातील लोकांची असल्याने ग्रामीण भागातील प्रचारात प्रितम म्हात्रे यांनी चांगलीच आघाडी मारुन विजयाची शिट्टी फुंकल्याचे दिसून येत आहे. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0