मुंबई

भारतीय जनता पक्षाच्या 40 नेत्यांची पक्षातून हकलपट्टी

•विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि महायुतीचे धर्म न पाळणाऱ्या नेत्याविरोधात पक्षाने आता मोठी कारवाई करत पक्षातून तब्बल 40 नेत्यांना हकलपट्टी केल्याचा पत्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रसिद्ध केले आहे

मुंबई :- विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अनेक भाजपाचे इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडखोरी करून महायुती धर्माला पाळता अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची संधी होते परंतु अनेक नेत्यांनी पक्ष आदेश न म्हणता अपक्ष उमेदवारी अर्जांवर कायम राहिले. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षविरुद्ध भूमिका घेत महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज भरल्याने त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच पक्षाने तब्बल 40 नेत्यांना पक्षातून हकलपट्टी केल्याचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध केले आहे.

या नेत्यांवर कारवाई

जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू, अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल, नेवासा – बाळासाहेब मरकुटे, सोलापूर – शोभा बनशेट्टी, अक्कलकोट – सुनिल बंडकर, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, सावंतवाडी – विशाल परब, धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे, अकोट गजानन महाले, वाशिम नागेश घोपे, बडनेरा – तुषार भारतीय, अमरावती – जगतीश गुप्ता, अचलपूर – प्रमोद गडरेल, गंगापूर सुरेश सोनवणे, वैजापूर – एकनात जाधव, मालेगाव कुणाल सूर्यवंशी, बागलान – आकाश साळुंखे, बागलान जयश्री गरुड, नालासोपारा हरिष भगत, भिवंडी स्नेहा पाटील, कल्याण वरुण पाटील, मागाठणे – गोपाळ जव्हेरी, साकोली – सोमदत्त करंजेकर, आमगाव – शंकर मडावी, चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपूरी वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली, उमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल, नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घणसांवगी – सतीश घाटगे, जालना- अशोक पांगारकर, यांच्यावर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बंडखोरी मध्ये अनेक महत्त्वाचे नेते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यामध्ये ज्येष्ठ नेते मानले जाणारे गोपाळ शेट्टी यांनी त्यांनीही बंडखोरी केली होती परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मन धरणी करत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानसभेच्या 37 मतदार संघात 40 अपक्ष भाजपाचे उमेदवार उभे असल्याने त्याचा नेमका फटका कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0