क्राईम न्यूजमुंबई
Trending

Vasai Crime News : अवैध पिस्तूल विक्री ; वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 ची कारवाई,09 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त

Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी आठ आरोपींना अटक करून 9 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. आरोपींच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई :- राज्यात राजकीय रणधुमाळी उडाली आहे. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अवैध धंदे, अंमली पदार्थ, बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांवर करडी नजर आहे. वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 Vasai Crime Branch 2 Unit यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पिस्तूल विक्री करणाऱ्या मोईन ऊर्फ जिलेबी अब्बूबयान सैयद, (वय 30 , धंदा मेरिज रा. दमानिया अपार्टमेंट, तळमजला, कोळीवाडा वसई ) आरोपीला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता इतर आठ आरोपींना अटक केली आहे. वसई पोलिसांनी दिलेल्या सरकारतर्फे फिर्यादी वरुन वसई पोलीस ठाणे येथे भा.द.का. कलम 3,25 (1) (3) सह महाराष्ट्र पोलीस अधि. 1959 चे कलम 37(1)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Vasai Crime News

गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून वसई कोळीवाडा ते सुरुचीबागकडे जाणारे रोडवरील सनटेक सिटी मेटचे समोरील अर्धवट बांधकाम असणारे तिन मजली बिल्डींग मध्ये जगदिश एकनाथ गोवारी या व्यक्तीच्या ताब्यात गावठी पिस्टल असल्याची माहीती , गुन्हे शाखा कक्ष-2 प्राप्त झाली होती. पोलीसांचे एक रवाना होवून सापळा रचुन प्रथमदर्शनी आरोपीला अटक करण्यात आले. आरोपीच्या ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडुन निरंतर कसून तपास केला असता बंदूक खरेदी करणारे व पुरवणा-या आरोपींची माहीती घेवून गुजरात व उत्तरप्रदेश या परराज्यातील आरोपींचा गुन्हयातील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.गुन्हयाचे तपासा दरम्यान परराज्यात तपासपथके पाठवून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.कारवाईमध्ये गुन्हयाचा तपास करीत अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींकडून 3 लाख 83 हजार 300 रुपये किंमतीची 9 देशी पिस्टल, 21 जिवंत काडतुसे व 5 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नमुद गुन्हयामध्ये आणखी व्यक्तींचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत तपास चालु आहे. Vasai Crime News

गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

1.मोइन ऊर्फ युनुस ऊर्फ जिलेबी अब्युबयान सैयद,( वय 30 वर्षे, धंदा मेरिज रा. दमानिया अपार्टमेंट, तळमजला, कोळीवाडा वसई )

2.जावेद इकबाल खान, (वय 36 वर्षे, धंदा चेल्डींग, रा. साईदत्त नगर, वसई कोळीवाडा, वसई )

3.मोहम्मद आरीफ ऊर्फ शाहरुख युसुफ खान, (वय 29, रा. चिता कॅम्प, ट्रॅॉम्बे, मुंबई)

4.अंकित रामभुजारथ निशाद उर्फ अंकित पटेल (वय 19, रा. जिल्हा- जीनपुर, राज्य उत्तरप्रदेश)

5.अमित विजय निशाद (सध्या. रा. गणेश नगर, यड़ोदरा, राज्य गुजरात मुळ गाव मिरसातपुर, पो बदलापूर, ता. जि. जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश)

6.अमितकुमार महाजन निशाद (वय 24 सध्या. रा. चांदीवली, अंधेरी पूर्व, मु. रा. ता- बदलापूर, जि. जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश)

7.आलम उर्फ अलीम झुलकरनैन खान (वय 28 रा. काझी चाळ, किस्मत नगर, कुर्ला पश्चिम, मुंबई)

8.देवा अजयकुमार प्रजापती, (वय 23, रा. राज्य उत्तरप्रदेश)

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, Commissioner of Police, Mira-Bhayandar, Vasai-Virar दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त , अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई यूनीटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी,रमेश आलदर,दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर, पोलीस शिपाई अजित मैड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड,रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, शुभम गायकवाड तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर शाखा यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे. Vasai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0