क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Dance Bar : पनवेल आणि नवी मुंबईतील डान्सबार बंद करणार लीना गरड यांचा एल्गार!

Navi Illegal Dance Bar News : लेडीज बार बंद करण्यात आमदार अपयशी ! अवैध बारविरोधात लढा देणार- लीना गरड

पनवेल महाराष्ट्र मिरर : खारघर नो लिकर्स झोन म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरात आम्ही संघर्ष समिती तसेच अन्य माध्यमातून लढा दिल्याने डान्स बारवर Navi Mumbai Dance Bar मर्यादा आल्या आहेत. परंतु पनवेल तालुक्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. अवैधरित्या चालणाऱ्या या बारमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या सर्व अवैध धंद्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पनवेल आश्वासन विधानसभा मतदार Panvel Vidhan Sabha संघाच्या महाविकास आघाडीच्या तथा ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड Leena Garad यांनी दिले आहे. Navi Mumbai Latest News

विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर त्या निवडणुक लढवत आहेत. पनवेल भागात लेडीज बारची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण नित्याचेच झाले आहे. अनेकांचे संसारही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अल्पवयीन तरुणांना त्याचे व्यसन लागत आहे. याविरोधात विधानसभेत आवाज उठ‌विणार असल्याचे गरड यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना सांगितले. लेडीज बार, महापालिकेतर्फे होणारी भरमसाठ करवाढ हे विशेष अजेंडयावर आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मला मतदान करा असे आवाहन लीना गरड करत आहेत. यापूर्वी शहराच्या कळंबोली, खारघर यासह अन्य भागांचा विकास सिडकोने केला आहे. महापालिकेने फक्त त्याची देखभालदुरुस्ती करायची आहे. मात्र महानगर पालिकेची स्थापना झाल्यापासूनच येथील स्थिती वाईट आहे. तेवढेही काम महापालिकेला जमत नाही. फक्त वाढीव कर लावून नागरिकांचे शोषण करत आहे. याविरोधात गेल्या साडेतीन वर्षांपासून लढा देत आहे.महिलांवर अत्याचार वाढत असल्याने वारंवार आंदोलने केली. शहराची अवस्था बकाल झाली आहे. लहान मुलांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था नाही. कमीतकमी पाचशे बेडचे रुग्णालय, पाणी समस्या यासारख्या समस्या, नैना प्रकल्प यासारखे प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Navi Mumbai Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0