Navi Mumbai Crime News : नवी मुंबई 85 लाख 50 हजार रोकड जप्त; पोलिसांकडून कसून चौकशी
•मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून कारवाई, सेक्टर 42 ए सीवूडस येथे कारवाई पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
नवी मुंबई :- राज्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यामध्ये एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. मुंबई ते भुलेश्वर मार्केटमध्ये 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून कारवाई करत 85 लाख 50 हजार रुपयांचे रोकड पकडण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ती गाजरांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हॉटेल समोरील रोडच्या पार्किंग मध्ये सेक्टर 42 ए सीवूडस, नवी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सापळा रचून पंचा समक्ष कारमधून 85 लाख 50 हजार रुपयांचे रोकड फक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोकनाथ गोविंद चंद्र मोहंती (33 वय), रतिलाल अंबाबाई पटेल (38 वय), विनीत मोहन लाल शर्मा (45 वय) यांना ताकद घेतली असून सदर रकमेची चौकशी करण्याकरिता बेलापूर विधानसभेचे निवडणूक आयोगाचे भरारी पथक कारवाई करत आहे.