Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 ची कारवाई ; बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक,
Navi Mumbai Police Arrested Man With Pistol : अवैध पिस्तुल बेकायदेशीर बाळगणे आणि विक्री करणे, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे
नवी मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची करडी नजर आहे. Navi Mumbai Police यंदाचे विधानसभा निवडणुका हायव्होल्टेज होणार असून या निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी अवैध बंदुकी, अंमली पदार्थ तस्करी, यांसारख्या बेकायदा धंद्यावरही पोलिसांची करडी नजर आहे. नवी मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष-3 Navi Mumbai Police Unit 3 यांनी कारवाई करत एकाला पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ Arrested Man With Pistol बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. Navi Mumbai Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 पथकाला माहिती मिळाली होती की, बेकायदा पिस्तूल जवळ असलेल्या व्यक्ती जवाहर इंडस्ट्रीयल, कामोठे येथे आहे. पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कामोठे परिसरात सापळा रचून 29(ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास अल्ट्रा प्लस ल्युब्स प्रा. लि कंपनी समोरील परिसरातून विवेक हरिविलास गिरी, (वय 26) हा त्याच्या जवळ असलेल्या देशी बनावटीचे पिस्टल व 2 राऊंड (अंदाजे 25 हजार 200 रूकि. चे) बेकायदेशीरपणे पिस्तूल त्याच्याजवळ आढळून आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्याचेविरूदध कामोठे पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह म.पो. का. कलम 37 (1) 135 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून गुन्हयाचा पुढील तपास कक्ष -3 गुन्हे शाखा करीत आहे. Navi Mumbai Latest News
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-3 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील, पोलीस हवालदार चेतन जेजुरकर, दिनेश जोशी, सचिन धनवटे,राजकुमार दुधाळ यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Navi Mumbai Latest News