मुंबई

Parag Shah : पराग शहा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार, पाच वर्षांत संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ

Maharashtra Richest Candidate Parag Shah: विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराग शाह हे सर्वात श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षांत त्यांची संपत्ती 575 टक्क्यांनी वाढली आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे दाखल झाली असून मालमत्तेचा तपशीलही समोर आला आहे. त्यामुळे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शहा Parag Shah हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती आहे. Parag Shah Net Worth निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे.

प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांनी त्यांच्याकडे 1 कोटी 81 लाख रुपये आणि पत्नीकडे 1.30 कोटी रुपये रोख असल्याची माहिती दिली आहे. तर पराग शाह यांनी 7783981 रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांच्या पत्नीच्या नावावर 8.65 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांच्यावर 43.29 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीवर 10.85 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. पराग शहा यांच्याकडे एकही कार नाही, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

पराग शहा हे घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत. Parag Shah Net Worth शाह हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत आणि त्यांचे प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये पसरलेले आहेत. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत त्यांनी 690 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांची पत्नी मानसी यांच्याकडेही कोट्यवधींची संपत्ती असून त्यात व्यावसायिक, निवासी आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले ते सर्वात श्रीमंत उमेदवार देखील होते. यासोबतच त्यांच्याकडे 422 कोटी रुपयांची जंगम आणि 78 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0