Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यंदाच्या निवडणुकीत अनेकांचे भवितव्य निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 Seat Sharing Formula : भाजप 148, काँग्रेस 102, शिवसेना (ठाकरे गट) 89, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)87, शिवसेना (शिंदे गट) 80, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 53 उमेदवार रिंगणात, मनसेने 117 उमेदवार रिंगणात उतरवले आहे
मुंबई :- यंदाची निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांमध्ये सामना करणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडा नंतर राज्यातील विधानसभेची निवडणूक Maharashtra Assembly Election 2024 चांगली चुरसेची बनली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज ठाकरे Raj Thackeray यांनी एकूण 117 आपल्या शिल्लेदार विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले आहे.
महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असून भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीकरिता तब्बल 148 उमेदवार रिंगणात उभे केले आहे. महाविकास आघाडीकडून मोठा पक्ष ठरलेला काँग्रेसने 102 उमेदवार रिंगणात उभे केले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून 89 उमेदवार रिंगणात आहे तर शिंदे गटातून 80 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना अजित पवार गटाला यंदाही समाधान व्यक्त करत 53 जागेवर उमेदवार दिले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकला चलो चा नारा देत 117 उमेदवार रिंगणात उभे केले आहे.
आता सर्वांच्या नजरा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेकडे (4 नोव्हेंबर) लागल्या आहेत. त्यानंतर लढत कशी असेल ते स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. शेवटच्या दिवशी 4 हजार 996 जणांनी अर्ज भरले.