Kalyan Crime News: बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कल्याण मधील दोघांना अटक, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
Kalyan Bajarpeth Police Arrested Illegal Weapon User : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांची कामगिरी
कल्याण :- राज्यात आचारसंहिता चालू Maharashtra Code Of Conduct असल्याने एका बाजूला राजकीय वातावरण तापलेले आहे. तसेच दिवाळी ची लगबगही चालू झाली आहे. अशा परिस्थिती कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून खबरदारी Kalyan Police म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला असून आता बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी ठेवली आहे. अशातच बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण Kalyan Bazaarpeth Police Station पोलिसांनी कामगिरी करत दोघांना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणे ताब्यात घेतले आहे. तसेच, तुमच्याकडून पोलिसांनी दोन जिवंत काडतुसे हि जप्त केले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांनीही कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. Kalyan Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती सॅमसंग गॅलरी, फोर्टिस हॉस्पिटल रोड बाजारपेठ कल्याण या ठिकाणी पिस्तूल (बंदूक) घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांचे अंग झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे एक बंदूक आणि दोन काडतुसे पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार 3,25 बी एन एस कलम 3(5),सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kalyan Latest Crime News
पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव विजय हरिहरन अय्यर, (वय 27 रा. राजाजी पथ, डोंबिवली पश्चिम) याच्या ताब्यात 7.65 mm बंदूक व दोन जिवंत काडतुसे मिळून आली, तसेच त्याचा साथीदार गणेश विनोद तिवारी, (वय 26 वर्ष, रा. म्हाडा बिल्डिंग, खोनी, डोंबिवली प) अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय अय्यर याच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे करत आहे. Kalyan Latest Crime News