- चतुशृंगी पोलीस स्टेशनकडून चोरट्यासह विधिसंघर्षित ताब्यात
- दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत
पुणे, दि. २८ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Crime News | रेंज हिल्स रोड, अशोक नगर येथे वृद्धाला मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाणा करून लुटणाऱ्या चोरट्यांना चतुशृंगी तपास पथकाने जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील दिड लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
संशयित आरोपी अली अजगर जावेद इराणी, वय २१ वर्ष, रा. इराणी वस्ती, विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर, पुणे व त्याचा साथीदार विधीसंघर्शित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन दोन अनोळखी इसमानी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याबाबत चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ८४१/२०२४ भा. न्या . सं. कलम ३०४(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल होता.
गुन्ह्याच्या घटनास्थळी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे व. पो. नि. विजयानंद पाटील तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील स. पो. नि. नरेंद्र पाटील व पो. हवा. वाघवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा पाटील इस्टेट येथील इराणी व त्याचा एक मित्र यांनी केला आहे.
आरोपी जे एम रोड, पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच जे एम रोड, पुणे येथे जाऊन सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी नामे अली अजगर जावेद इराणी, वय २१ वर्ष, रा. इराणी वस्ती, विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर, पुणे व त्याचा साथीदार विधीसंघर्शित बालक यांना तपास पथकाने ताब्यात घेतले. आरोपी नामे अली अजगर जावेद इराणी यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करून त्याची न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून दोन तोळ्याची सोन्याची चैन व गुन्हा करताना वापरलेली ऍक्टिवा गाडी असा एकूण १,५०,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुशृंगी पोलीस स्टेशनचे व. पो. नि. विजयानंद पाटील, स पो नि नरेंद्र पाटील, पोलिस उपनि प्रणिल चौगले, पो हवा वाघवले, पो हवा दुशींग, पो हवा श्रीधर शिर्के, पो हवा दांगडे, पो हवा मोमीन, पो हवा विशाल शिर्के, पो हवा तांदळे, पो शि भांगले व पो शि तरंगे यांनी केली आहे.