Mumbai Local Update : मुंबई दिवाळी खरेदीला रेल्वेचा ब्रेक, रविवारी मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पाडा
Mumbai Local Train Update: रविवारी (27 ऑक्टोबर) मध्य,पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!
मुंबई :- दिवाळीचे लगबग चालू आहे. उद्या दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर सह उपनगरातील लोकही रेल्वेने प्रवास Mumbai Local Train करत दिवाळीच्या खरेदीला मुंबईत दाखवण्याचे शक्यता असतानाच आता रेल्वेच्या मेगा ब्लॉकने Mumbai Mega Block मुंबईकरांना आता ब्रेक लागला आहे.उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, 27 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु या ब्लॉकमुळे दिवाळी सणाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसह चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. Mumbai Local Train News Update
मध्य लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. परिणामी, जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल 10 ते 15 मिनिट विलंबाने धावणार आहेत. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11 तर दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ब्लॉककाळात सीएसएमटी ते वाशीदरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहेत. Mumbai Local Train News Update
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द केल्या असून काही चर्चगेट लोकल वांद्रे-दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. Mumbai Local Train News Update