क्राईम न्यूज
Trending

Nandu Naik Club Pune | पुणे : कुख्यात नंदू नाईकच्या अवैध क्लबवर गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६० जण ताब्यात

  • अवैध धंदे बंद करण्याचे पुणे पोलिसांसमोर आव्हान

पुणे, दि. २६ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Nandu Naik Club Pune |

पुण्यातील कुख्यात नंदू नाईकच्या अवैध धंद्यावर पुणे शहर गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. रात्री झालेल्या ऑपेरेशन मध्ये तब्बल ६० जुगारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे शहरात अवैध धंदे बंद असताना नंदू नाईक कोणत्या ‘वसुलीवाल्याच्या’ आशीर्वादाने निर्ढावला होता याची खमंग चर्चा पोलीस आयुक्तलयात रंगली आहे. Nandu Naik Club Pune |

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार CP Amitesh Kumar यांनी अवैध धंदे कडेकोट बंद ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कडक सूचना दिल्या होत्या.

काल रात्री उशिरा गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने खडक हद्दीतील जनसेवा भोजनालय, पाहिला मजला, शुक्रवार पेठ पेठेतील चर्चित नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून तब्बल ६० जणांना ताब्यात घेतले.

सदर कारवाई मध्ये रक्कम 1,00,250/-रोख व 47 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीसह एकूण 60 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यापूर्वी नंदू नाईक विरोधात मोक्का कारवाई झाली आहे.

सदरची कारवाई Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा.पो. आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथक १ व २, खंडणी विरोधी पथक १, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1, युनिट 1 व 5 यांनी सदरची कारवाई केली आहे. Nandu Naik Club Pune

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0