Thane Murder News : 2017 मध्ये झालेल्या खुनातील आरोपीला जन्मठेप!, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
Thane High Court On Murder :किरकोळ वादातून हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
ठाणे :- क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने हत्या Thane Murder करणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची Thane High Court शिक्षा सुनावली आहे. सन 2017 मध्ये आरोपी सुरज प्रदीप जैस्वाल (29 वय) याने क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने विकास शामबहादुर उपाध्याय (21 वय) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले होते. Thane Latest Crime News Update
याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात Kapoorbawadi Police Station सन 2017 मध्ये भादवि कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारवकर आणि त्यांच्या पथकाने केला होता.आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. Thane Latest Crime News Update
गुन्हयाची सुनावणी सिरसीकर ( जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे-3) यांनी घेवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपी सुरज प्रदीप जैस्वाल (29 वय) यास सी.आर.पी.सी. 235 (2) सह भा.द.वि कलम 302,34 प्रमाणे दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खुनाच्या गुन्हयाच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता रश्मी क्षीरसागर, तत्कालीन तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेटे, पोलीस हवालदार मनोरे, गाबीत नेम कापूरबावडी पोलीस ठाणे यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले त्यामुळे गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसाचे कौतुक होत आहे. Thane Latest Crime News Update