Vasai Crime News : हॉटेलमध्ये चालविले जात होते सेक्स रॅकेट ; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, वसई यांची कारवाई, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
•पोलिसांकडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दलाला अटक, वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून दोन पीडित मुलींची सुटका
वसई :- हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा अड्डा बनलेल्या हॉटेल रुद्र शिवसागर याच्यावर छापा टाकत पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेला अटक केली असून वेश्याव्यवसायातील दलदलीतून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे.
प्रॉफीट सेंटर बिल्डींग रेंज ऑफीस जवळ, असलेल्या हॉटेल रुद्र शिव सागर येथे एका महिला वेश्यादलालाकडून तीन हजारांच्या बदल्यामध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस गिऱ्हाईक आणि दोन पंचांच्या समक्ष कारवाई करत वेश्या दलाल नेहा मैराज खान (27 वय रा. नालासोपारा) हिला अटक केली आहे. दोन महीला पिडीतांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे.
या दरम्यान, एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गिऱ्हाईकाने या पथकाला मोबाईलवर मिस कॉलद्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात पोलिसांनी वेश्यादलाल अटक केली असून पीडित महिलेंना सुटका केली आहे.तसेच,नेहा मैराज खान (27 वय रा. नालासोपारा) पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून पीडित महिलांना वेश्या व्यवसायाचे काम करून घेत असेल आणि त्या मोबदल्यात काही रक्कम त्यांना दिली जात असत याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेच्याविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 143(2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार व सहाय्यक फौजदार गई, पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, शिंदे, महिला पोलीस शिपाई पाठील सर्व नेम. अनै. मा. वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.